राज्यसभेतील (Rajyasabha) विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad) यांचा कार्यकाळ संपतो आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सभागृहात एक छोटे भाषण केले. या भाषणात गुलाम नबी आजाद जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री असतानाची एक आठवण सांगताना पंतप्रधान मोदी यांच्या डोळ्यात अश्रू आले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ ट्विट करत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनेही प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाम नबी आजाद यांच्याबाबतची आठवण सांगतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेतील व्हिडिओ ट्विट करत रितेश देशमुख याने म्हटले आहे की, गुलाम नबी आजाद यांना विरोधी पक्षनेते पदावरुन निरोप देतानाचा पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकून मी फार प्रभावित झालो. रितेश देशमुख याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. यावर अनेक लोक प्रतिक्रिया देऊ लागली आहेत.
रितेश देशमुख याने ट्विटमध्ये काय म्हटले?
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आजाद यांच्याबद्दलच्या निरोपाच्या भाषणामुळे मी खूप प्रभावित झालो. (हेही वाचा, जेव्हा मी पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल वाचतो, तेव्हा मला हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान वाटतो - गुलाम नबी आझाद)
गुलाम नबी आजाद यांच्याबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
गुलाम नबी आजाद यांच्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी सभागृहात म्हणाले, गुलाम नबी हे मुख्यमंत्री होते. तेव्हा मीही एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आमचा निकटचा संपर्क होता. एकदा गुजरातच्या काही पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 8 गुजराती नागरिकांचा मृत्यू झाला. या वेळी मला गुलाम नबी आजाद यांचा सर्वात आधी फोन आला. त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. त्यांनी तशाच अवस्थेत मला ही घटना सांगितली. प्रणव मुखर्जी हे तेव्हा संरक्षण मंत्री होते. मी त्यांना मृतांचे पार्थीव आणण्यासाठी लष्कराचे विमान देण्याबाबत विनंती केली. त्यांनी सांगितले चिंता करु नका मी व्यवस्था करतो.
Deeply moved by Hon Pm @narendramodi ji speech in RajyaSabha bidding farewell to @ghulamnazad sahab. https://t.co/pW6VopiVjy
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 9, 2021
पुढे बोलतान पंतप्रधान मोदी म्हणाले, गुलाम नबी आजाद यांचा मला फोन आला तेव्हा ते माहिती देत होते. आपण जशी आपल्या घरातल्यांची चौकशी, काळजी करतो तशीच काळजी ते मृतांबाबत करत होते. सत्ता जीवनात येते जाते. परंतू, सत्ता कशी वापरावी हे गुलाम नबी आजाद यांच्याकडून शिकावे. माझ्यासाठी तो अत्यंत भावनिक क्षण होता. दुसऱ्या दिवशी मला पुन्हा फोन आला. गुलाम नबी फोनवर होते. त्यांनी विचारले सर्वांचे मृतदेह मिळाले काय. आजही त्या घटनेबाबत गुलाम नबी यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे.