पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 19 जानेवारी रोजी सोलापूर (Solapur) दौऱ्यावर येणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण ते यावेळी करणार आहेत. सोलापुरातील रे नगर येथे 365 एकर जागेवर या प्रकल्प उभारण्यात आलाय. यावेळी पंतप्रधान मोदी हे सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचे वाटप करणार आहेत. पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत हा घरे बांधण्यात आली आहेत. असंघटित श्रमिक कामगारांना पाच लाखांत त्यांच्या हक्काचे घर या योजनेअंतर्गत मिळेल. मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना घराचे वितरण करत चावी वाटपाचे नियोजन करण्यात आलंय. (हेही वाचा - PM Modi Inspected Atal Setu: पंतप्रधान मोदींनी केली अटलबिहारी वाजपेयी शेवरी-न्हावा शेवा अटल सेतूची पाहणी, (Watch Video))
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या रे नगरचे उद्घाटन अवघ्या काही दिवसावर आल्याने सर्वच लोकार्पण सोहळ्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणारं आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत.