संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जाळे दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असताना भारतातही या विषाणूने चांगलीच दहशत माजवलीय. त्यामुळे भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असून आज या लॉकडाऊनचा पाचवा दिवस आहे. दर रविवारप्रमाणे आजही सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावर सध्या संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसविषयी चर्चा करतील. तसेच लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज पहिल्यांदाच ते मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी चर्चा करतील. या कार्यक्रमातून पंत्परधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करतील.
सध्या संपूर्ण देशात पसरलेल्या COVID-19 मुळे सर्व देशवासियांनी सुन्न करुन ठेवले आहे. अशा अवस्थेत लॉकडाऊन मुळे लोकांचीही चांगलीच गोची झाली आहे. घरातून बाहेर पडून नका असा सल्ला सरकारकडून दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपायी लोकांनी घराबाहेर जाणे बंद केले आहे. तर काहींना अजूनही या घटनेचे गांभीर्य नसल्याने घराबाहेर पडणा-या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवणे सुरु झाले आहे. अशा वेळी द्विधा मन:स्थितीत असलेल्या देशवासियांचे मनोबल वाढविण्याचे काम आज नरेंद्र मोदी मन की बात या कार्क्रमातून करणार आहेत. हेदेखील वाचा- Coronavirus: इटली येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर पोहचला-AFP यांची माहिती
पाहा ट्विट:
Prime Minister Narendra Modi will address the nation through his radio programme '#MannKiBaat', at 11 AM today. The episode will be focused on the situation prevailing due to #COVID19. (File pic) pic.twitter.com/IULbJgTvN1
— ANI (@ANI) March 29, 2020
कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच सरकारकडून सुद्धा विविध नियमांची अंमलबजावणी करत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच प्रयत्न केला जात आहे. तरीही कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 918 वर पोहचला आहे. तर 80 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 19 जणांचा आतापर्यंत देशात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.