पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक दिल्ली येथे आज पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेची आणि निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि नरेंद्र तोमर (Narendra Tomar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर दुसऱ्या वर्षात पदार्पण केल्यावर ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यातून केंद्र सरकारने आपली वचनपूर्तीच केली.
पुढे बोलताना जावडेकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांना 14 टक्के किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) देण्यास मंजूरी देण्यात आली. तसेच, शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या 50 ते 83 टक्के अधिक मूल्य मिळेन असेही जावडेकर म्हणाले. (हेही वाचा, मुंबई येथून दिल्लीत आलेल्या ICMR मधील वरिष्ठ वैज्ञानिक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)
#WATCH LIVE: Union Ministers Prakash Javadekar, Nitin Gadkari and Narendra Tomar address the media in Delhi on Union Cabinet's decisions https://t.co/3mo97GEPcV pic.twitter.com/SJRs7W3SBJ
— ANI (@ANI) June 1, 2020
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयामुळे सुक्ष्म, लघू उद्योगांच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. MSME आत्मनिर्भर भारत घोषणेनंतर एक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. MSME ने 11 कोटी रोजगार दिल्याचेही गडकरी यांनी सांगितले.