Constitution Day 2020: संविधान दिनाच्या निमित्ताने President Ram Nath Kovind यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारी मंत्री, अधिकारी, कर्मचार्‍यांकडून संविधानाचे वाचन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits: PTI/File)

भारतामध्ये आज (26 नोव्हेंबर) हा दिवस संविधान दिवस (Constitution Day 2020) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत आज सकाळी शासकीय काम सुरू करण्यापूर्वी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी संविधानाचे वाचन केले आहे. त्यासोबतच भारतभर विविध शासकीय कार्यालयातही सरकारी मंत्री, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संविधानाचे वाचन केले आहे. या कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करून सामुहिक वाचन आणि निष्ठा पाळण्याचा शपथ सोहळा पार पडला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अस्तित्त्वामध्ये आले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. Constitution Day of India 2020: 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस का साजरा केला जातो?

राष्ट्रपतींकडून संविधानाचे वाचन

डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील दिल्लीमध्ये पृथ्वी भवन मध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत संविधानाप्रति निष्ठा राखण्याची शपथ घेतली आहे.

भारतीय संविधान तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. भारत 15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिशांच्या पारातंत्र्यातून बाहेर पडून मुक्त झाला. परंतु, भारतीय राज्यघटना प्रस्थापित करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला. या संविधानाने प्रत्येक भारतीयाला त्याच्या हक्क व जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे त्यापर्ति आदरभाव आणि निष्ठा पाळण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे.