दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंहचा दयेचा अर्ज आज (17 जानेवारी) राष्ट्रपतींनी फेटाळला आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind ) यांनी हा अर्ज फेटाळल्यानेआता मुकेश सिंह यांना फासावर चढवण्याचा निर्णय आता मोकळा झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे मुकेश सिंह (Mukesh Singh) यांनी दयेचा अर्ज दाखल केला आहे. यावेळेस फाशी टाळून शिक्षा कमी करावी अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी अर्ज फेटाळला होता. Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी.
दिल्ली येथील पटियाला कोर्टाने निर्भया प्रकरणी मुकेश सिंह सह चारही आरोपींना फाशी देण्याची शिक्षा 7 जानेवारी दिवशी ठोठावली आहे. त्यावेळेस 22 जानेवारी हा दिवस ठरवण्यात आला आहे. दरम्यान तिहार तुरुंग प्रशासनाने 17 जानेवारीपर्यंत फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती द्यावी,असे आदेश दिल्ली न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला दिले होते. तुरुंग प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
President Ram Nath Kovind rejects the mercy petition of 2012 Delhi gang-rape case convict Mukesh Singh
Read @ANI Story l https://t.co/IgJMI2M8Jy pic.twitter.com/hscjtTIo8G
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2020
दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दया याचिका (Mercy Petition Nirbhaya Case)फेटाळल्यानंतर त्यांना वेळ देण्यात यावा असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात येत आहे यामध्ये 22 जानेवारीची फाशी पुढे ढकलण्यासाठी वकिल प्रयत्न करत आहेत. दया याचिका फेटाळल्यानंतर आरोपींना 15 दिवसांची मुदत मिळावी असे देखील आरोपींच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे.