सायबर गुन्ह्याच्या (Cyber Crime) एका प्रकरणात भोपाळ (Bhopal) पोलिसांच्या सायबर युनिटने दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. यातील एक महाविद्यालयात शिकत आहे आणि दुसरा NEET परीक्षेची तयारी करत आहे. या दोघांवर महाविद्यालयीन झूम मीटिंग्जवर अश्लील व्हिडिओ (Porn Videos) शेअर करणे तसेच स्वतःचे प्रायव्हेट (Privates) पार्टस फ्लॅश करणे असे आरोप आहेत. सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांविरुद्ध पुरावा म्हणून तपासकर्त्यांनी त्यांची चप्पल जप्त केली आहे. जेव्हा विद्यार्थ्याने झूम मिटिंगमध्ये प्रायव्हेट पार्ट फ्लॅश केला होता तेव्हा हीच चप्पल दिसत होती.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राज्य सायबर सेलचे प्रमुख एडीजी योगेश देशमुख यांना करिअर कॉलेजमधून 3 जून रोजी कोणीतरी त्यांची व्हर्च्युअल व्हायव्हा चाचणी हॅक करून अश्लील कंटेंट फ्लॅश केल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर याबाबतचा तपास सुरू झाला. नंतर कॉलेजकडून झूम मिटिंगमध्ये अश्लील व्हिडिओ पोस्ट करणे, खाजगी गोष्टी फ्लॅश करणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारीही पोलिसांना मिळाल्या. यासोबतच 10 पेक्षा जास्त शिक्षकांनी त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ आल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
तपासाअंती पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. भोपाळमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या मित्रासोबत ऑनलाइन क्लासची लिंक शेअर करत असे. त्यानंतर त्याचा मित्र फेक आयडीवरून क्लासमध्ये सहभागी होत असे. यानंतर हे दोघे ऑनलाइन क्लासमध्ये प्रायव्हेट पार्ट दाखवणे, अश्लील व्हिडिओ, फोटो पाठवणे असे कृत्य करायचे. त्यांनी एका महिला प्राध्यापकाची चेष्टा करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन क्लासदरम्यान अश्लील व्हिडिओ शेअर केला होता.
इतकेच नाही तर त्यांनी महिला प्राध्यापकांना त्यांच्या वैयक्तिक क्रमांकावर अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवले होते. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी यांचा माग लावला. पोलिसांच्या चौकशीत आरोपी विद्यार्थ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. (हेही वाचा: नापास करण्याची धमकी देऊन तीन विद्यार्थिनींवर बलात्काराचा प्रयत्न, शिक्षकावर कारवाई करण्याची कुटूंबियांची मागणी)
दोन्ही विद्यार्थ्यांनी हे कृत्य सुरुवातील क्लास बंद पाडण्यासाठी व नंतर मौजमजेसाठी आणि परीक्षा थांबवण्यासाठी केल्याचे सांगितले. यापूर्वीही या दोन्ही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात असे प्रकार केले आहेत. आता पोलीस दोघांच्या जुन्या गुन्हेगारी नोंदी तपासत आहेत. त्याचवेळी राज्याचे सायबर एसपी वैभव श्रीवास्तव यांनी पालकांना आवाहन केले आहे की, जे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबापासून लांब शिकत आहेत, अशा पालकांनी त्यांच्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. मुलांचे मित्र तसेच त्यांचे शिक्षक यांच्याकडून वेळोवेळी आपल्या पाल्याची माहिती घेत राहावी.