PNB Scam: हिरे व्यापारी नीरव मोदी याची संपत्ती अॅटेच करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
Nirav Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आर्थिक घोटाळा (PNB Scam) प्रकरणात विदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Diamond Merchant Nirav Modi) याच्या पाठीमागे लागलेला कायद्याचा दोर अधिक आवळला जातानाचे चित्र आहे. नीरव मोदी (Nirav Modi) सध्यास्थीती यूके कोर्टात प्रत्यार्पण कारावाईचा सामना करत आहे. त्यासोबतच जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्यावर आर्थिक गुन्हा अधिनियम, 2018 अन्वये विशेष न्यायालयाने नीरव मोदी आणि त्याची बहीण पूर्वी मेहता यांना नोटीस जारी केली आहे. पूर्वी मेहता ही पाच महिन्यांपूर्वी सरकारी साक्षीदार बनली होती. विशेष न्यायाधीश वी.सी. बर्डे यांनी मुंबईमध्ये 11 जून रोजी नीरव आणि त्याच्या बहिणीने कोर्टात प्रत्यक्ष हजर व्हावे असे नोटीस बजावले आहे. न्या. बर्डे यांनी जारी केलेल्या नोटीशीमध्ये हेही विचारण्यात आले आहे की, विशेष न्यायालयाने प्रवर्तन निदेशालय (ईडी) द्वारा 2018 च्या सुरुवातीला दाखल केलेल्या एका मनी लॉन्ड्रींग प्रकरणात दोघा भावा बहिणीची (नीरीव मोदी, पूर्वी मेहता) आणि कायद्यानुसार त्यांच्या इतर सलग्न कंपन्यांची संपत्ती जप्त (Nirav Modi's Assets) का करु नये? याचा खुलासाही करण्यास सांगितला आहे.

नीरव मोदी, त्याच्या परीवारातील काही सदस्य, त्याचे मामा मेहुल सीचोकसी आणि इतरांविरोधात पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) मधून सुमारे 14,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लागल्यांनंतर जवळपास साडेतीन वर्षांनी न्यायालयाने हा आदेश दिले आहेत. फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबईच्या एका मजिस्ट्रेटने नीरव मोदी विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. जून, 2018 मध्ये इंटरपोलने एक रेड कॉर्नर नोटीस जारी केले, त्यानंतर भारत-इंग्लंडकडे नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाची मागणी 2018 मध्ये केली. मार्च 2019 मध्ये त्याला इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. (हेही वाचा, Nirav Modi Extradition: ब्रिटिश कोर्टाने दिले फरार निरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश; लवकरच आणले जाणार भारतात, आर्थर रोड कारागृह बॅरेक 12 असू शकते नवी जागा)

दरम्यान, नीरव मोदी हा भारती राजकारणातील एक टीकेचा विषय झाला आहे. जेव्हा जेव्हा काळा पैसा, स्वीस बँकेतील पैसा, भ्रष्टाचार,आर्थिक घोटाळा असा विषय येतो तेव्हा भारतीय राजकारणात सहाजिकच नीरव मोदी, विजय मल्या, ललीत मोदी आदी लोकांचा उल्लेख ओघानेच केला जातो.