Narendra Modi | (Photo Credits:pmindia.gov)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांपासून नागरिकांना सावधगिरी बागळण्याचा सल्ला दिला आहे. खरंतर पावसात किड्या-मुंग्या आपल्या बिळातून बाहेर पडत नागरिकांच्या घरात शिरकाव करतात. त्याचसोबत साठलेल्या पावसाच्या पाण्यात मलेरियाचे डास आपली अंडी घालत असल्याने मलेरियाच्या आजाराचा धोका अधिक संभवतो. याच संदर्भातील एक ट्वीट पीएम मोदी यांनी असे म्हटले आहे की, हा उष्णकटिबंधीय आणि वेक्टर जनित आजारांचा ऋुतू आहे. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करत आहे. सरकारकडून सुद्धा या परिस्थितीकडे लक्ष दिले जात असून रुग्णांवर सुनिश्चित उपचार करण्यात येत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी या ट्वीटसह दूरदर्शन न्यूनचा सुद्धा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मान्सूनमध्ये डासांपासून होणाऱ्या आजारांपासून बचाव करावा असे म्हटले आहे. तसेच अशा आजारांवर लगाम बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याबद्दल ही बाळगल्यास पावसाळ्यातील आजारांपासून अगदी सहज बचाव करणे शक्य आहे.(COVID 19 Tests In India: देशात आजवर 3 कोटी हुन अधिक कोरोना चाचण्या, मृत्यु दर अवघ्या 2 टक्क्यांहुन कमी- आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, पावसाळ्याच्या काळात मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यु सारखे साथीचे आजार सहज वाढतात. हे आजार काही वेळेस जीवावर सुद्धा बेतात. त्यामुळे अशा आजारांवर वेळीच उपचार करणे महत्वाचे आहे.काळजी न घेतल्यास काही जणांनी आपला जीव सुद्धा गमावला आह. याच कारणास्तव या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास आरोग्याची पुर्णपणे काळजी घ्यावी.