PM Narendra Modi, UP CM Yogi Aadityanath यांच्या आधारकार्ड सोबत छेडछाडी प्रकरणी एक जण अटकेत
Narendra Modi | (File Image)

आधार कार्ड (Aadhaar Card) हा भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. याच्या आधारे अनेक महत्त्वाचे व्यवहार होत असतात. एका 12 अंकी आधारकार्ड क्रमांकावर सारी खाजगी माहिती साठवलेली आहे. अशात एका व्यक्तीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narewndra Modi) आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्या आधारकार्ड सोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई गुजरात पोलिसांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती बिहारच्या मुजफ्फरपूर भागातील आहे.

Madan Kumar या आरोपीला Sadatpur भागातून अटक केल्याची माहिती Senior Superintendent Rakesh Kumar यांनी दिली आहे. Madan Kumar हा पदवीचं शिक्षण होता. त्याचं शिक्षण Sadatpur मध्येच सुरू आहे. नक्की वाचा: Verify Aadhaar Card: संभाव्य गैरवापराला आळा घालण्यासाठी ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा - UIDAI .

व्हिसिटिंग पोलिस टीम सोबत स्थानिक पोलिस देखील होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये आयपी अ‍ॅड्रेस ट्रेस करण्यात आला आहे. आरोपीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या जन्मतारखेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता. बदल केलेले आधारकार्डचा चूकीचा वापर देखील करण्यात आला आहे.

सध्या गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीची पुढील चौकशी सुरू आहे.