भारत देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या बजेटचं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कौतुक केलं आहे. हे बजेट विकसनशील असल्याचं म्हटलं आहे. तरूणांना नव्या संधी मिळणार आहे. यामध्ये सामान्य नागरिकांच्या , ग्रामीण भारताच्या गरजा पूर्ण करणारं आहे. हे एक ग्रीन बजेट आहे. यामध्ये इलेक्ट्रिक स्कुटर, सोलर एनर्जी यांना प्रोत्सहन देणारं आहे. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पातील 159 वर्ष जूनी परंपरा मोडली, लेदर बॅग ऐवजी लाल कपड्यातून आणली कागदपत्रं; आर्थिक सल्लागार के. सुब्रम्हणम यांनी केला 'खास' खुलासा
नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
My thoughts on the #BudgetForNewIndia. Watch. https://t.co/cJYfirRHfa
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2019
महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी नव्या सुविधा दिल्या जाणार आहे त्याचं कौतुक करण्यात आलं आहे. भारताची अर्थव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी यंदाचे बजेट मदत करणारं असेल असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
निर्मला सीतारमण मोदी सरकारमध्ये आधी संरक्षणमंत्री होत्या आणि आता नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री पद सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार्या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.