हिमाचल प्रदेशसह संपूर्ण देशवासिय गेल्या कित्येक वर्षांपासून जगातील सर्वात मोठ्या बोगद्याची वाट पाहत होते तो रोहतांग मधील 'अटल बोगदा' अखेर पूर्ण झाला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे अनावरण करण्यात आले. यावेळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. 'आज केवळ अटलजींचे नाही तर हिमाचल प्रदेशातल्या करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण धाले आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील अंतर 3-4 तासांनी कमी होईल' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. हा बोगदा हिमाचल आणि लेह-लडाखला जोडणारा असल्यामुळे याचा फायदा येथील जनतेसह भारतीय सैन्यालाही होणार आहे.
या बोगद्यामध्ये एकाच वेळी 3000 कार वा 1500 ट्रक एकाचवेळी प्रवास करू शकतील असे सांगण्यात येत आहे. यात 150 मीटरवर फोन, 60 मीटरवर फायर हायड्रेन्ट आणि 500 मीटरवर इर्मजन्सी दरवाजे लावण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल. Atal Tunnel Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या हस्ते आज रोहतांग मधील 'अटल बोगद्या'चे अनावरण, सकाळी 10 वाजता होणार हा ऐतिहासिक कार्यक्रम
There is nothing more important for us than protecting the country. But the country has also seen that a period when the defense interests of the country were compromised: PM Modi at Rohtang https://t.co/cHtMC0pNGp
— ANI (@ANI) October 3, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अटल बोगद्याविषयी' भाषणात सांगितलेले ठळक मुद्दे
1. अटल बोगदा हा एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. मात्र सुरुवातीच्या काळात त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. यावेळी लडाखमधील दौलत बेग ओल्डी रुपातील महत्वपूर्ण एयर स्ट्रिप 40-45 वर्ष बंद राहिले. त्यावेळी नक्की काय दबाव होत याबद्दल विस्तारात न गेलेलेच बरे.
2. मात्र अटल बोगदा बनविण्याच्या कामाला 2014 नंतर चांगलाच वेग आला. ज्याचा परिणाम आधी दरवर्षी 300 मीटर सुरंग बनवली जात होती ज्याचा वेग वाढवून वर्षाला 1400 मीटर बनवली जाऊ लागली. ज्याचा परिणाम 26 वर्षाचे हे काम केवळ 6 वर्षात पूर्ण झाले.
3. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2014 पर्यंत या बोगद्याचे काम ज्या वेगाने सुरु होते तसेच पुढे सुरु राहिले असते तर हा बोगदा 2040 मध्ये पूर्ण झाला असता. याचाच अर्थ तुमचे आज जे वय आहे त्यात 20 वर्ष आणखी जोडा. तेव्हा जाऊन लोकांना हा दिवस पाहायला मिळाला असता.
4. अटल बोगदा सोबत बिहार मधील कोसी महासेतु चे काम देखील आम्ही 2014 मध्ये तेजीने सुरु केले. ज्याचा परिणाम काही दिवसांपूर्वीच या कोसी सेतुचा लोकार्पण सोहळा पार पडला.
हा अटल टनल बोगदा लेह-लडाख सीमेवर तणावग्रस्त परिस्थितीत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. ज्यामुळे भारतीय सैन्याला अगदी सहजगत्या सामान, हत्यारांची ने-आण करता येईल. तसेच पर्यटनासाठी आणि दळणवळणासाठी देखील हा बोगदा महत्त्वाची भूमिका बजावेल.