देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) या विषाणूचे जाळे हळूहळू पसरत चालले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज दुपारी 3 वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी देशाची पुढील रुपरेषा काय असेल याबाबत चर्चा केली जाईल. त्यासोबतच लॉकडाऊनबाबतही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीविरोधात मोठा लढा देत आहे. हा लढा यशस्वी होण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
लॉक डाऊनचा तिसरा टप्पा म्हणजेच 4 मे ते 17 मे पर्यंत असणाऱ्या या लॉक डाऊन मध्ये अनेक राज्यातील उद्योग धंद्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही रोजंदारीवर जगणा-या स्थलांतरित मजूरांपुढे भूकमारीची समस्या निर्माण झाल्यामुळे अनेकांनी गावाकडचा रस्ता धरला आहे.
हेदेखील वाचा- Coronavirus: दिल्लीत गेल्या 24 तासांत 56 ITBP जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
अशा परिस्थितीत सरकारने देखील या लोकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे, बस सेवा सुरु केली आहे. सरकारच्या प्रयत्नामुळे अनेक राज्ये ग्रीन झोन मध्ये आली आहेत. जी राज्य पूर्णतः कोरोना मुक्त आहेत म्हणजेच ग्रीन झोन मध्ये आहेत तिथे नियमित कामकाज सुरु करण्याची परवानगी याआधीच गृहमंत्रालयाने दिली आहे. तसेच ऑरेंज झोन च्या बाबतही अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. आजच्या कॉन्फरन्स मध्ये अजून कोणते नियम हटवता किंवा लागू करता येतील याचा आढावा घेतला जाईल.
सद्य स्थितीत भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 62,939 इतकी आहे. यात 19,358 रुग्ण बरे झाले असून 2109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात येथे 20,228 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात आणि दिल्ली मध्ये सवाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात काल 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.