Loss In Betting and Wife's Murder: फिजिओथेरपिस्टने चिरला पत्नीचा गळा, सट्टेबाजीत पैसे गमावल्याच्या वादानंतर कृत्य
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Prades) राज्यातील ठाकूरगंज (Thakurganj) येथील एका फिजिओथेरपिस्टने (Physiotherapist) आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. जुगार (Betting) खेळण्यावरुन झालेल्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडितेच्या आईने घराला भेट दिल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा उलघडा झाला. आनंदेश्वर (वय 40 वर्षे) असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

आरोपीला जुगार खेळण्याचा नाद

पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या आईने मंगळवारी घरी भेट दिली तेव्हा एका खोलीत तिच्या मुलीचा मृतदेह आढळून आला तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला. तपासात असे दिसून आले आहे की, आरोपीला जुगार खेळण्याचा नाद होता. अलिकडेच तो जुगारात मोठी रक्कम हारला होता. जुगारात मोठे नुकसान झाल्यामुळे या जोडप्यामध्ये वाद निर्माण झाला असावा, ज्यामुळे हा गुन्हा घडला असावा असा प्राथमिक संशय आहे. (हेही वाचा, Murder Cases In India: भारतात 2022 मध्ये तब्बल 28,522 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद; 70% पीडित पुरुष: NCRB)

भिंतींवर रक्ताच्या चिळकांड्या

पीडितेची आई कमला (राहणार- संध्या साहू (३८) नाका हिंदोळा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कमला या आपल्या मुलीच्या ठाकूरगंज येथील राहत्या घरी मंगळवारी दुपारी गेल्या असता त्यांना थरारक चित्र पाहायला मिळाले. त्यांना आपल्या मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या आवस्थेत घरातील बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. खोलीमध्ये रक्ताचेही डाग पाहायला मिळाले. भिंतींवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या.

एडीसीपी, पश्चिम विभाग, सी.एन. सिन्हा यांनी सांगितले की, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, सोमवारी रात्री कमलाने आपल्या मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरुन कोणताही प्रतिसाद आला नव्हता. संध्या यांचा मुलगा शौर्य (9) याने कमलाला फोन करून आई-वडील घरी बेपत्ता असल्याची माहिती कमला यांना सकाळीच दिली होती. ज्यामुळे त्या मुलीला भेटण्यासाठी घरी पोहोचल्या होत्या. घरी पोहोचल्यावर कमलाला भीषण दृश्य दिसले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. संध्याचा मोठा मुलगा, तनिष्क लहान आहे त्याला इका धक्का बसला आहे की, तो बोलू शकत नाही. कमला जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा तो देखील तिथे होता. संध्याचा भाऊ अमन साहू याने आनंदेश्वरवर खुनाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. अमन साहूने पुढे असा आरोप केला की आनंदेश्वरने त्याचा भाऊ मिंटूसह संध्यावर यापूर्वी हल्ला केला होता. त्यावेळी पोलीसांमध्ये तक्रारही करण्यात आली होती. आनंदेश्वर आणि संध्या यांचे 2008 मध्ये लग्न झाले होते.