![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Petrol-Price-1-380x214.jpg)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol And Diesel Rates) आज सलग सातव्या दिवशी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज पेट्रोल चे दर 59 पैसे प्रति लिटर तसेच डिझेलचे भाव हे 58 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत, मागील सात दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे एकूण 3.9 व 4 रुपये इतकी वाढ झाली आहे. यामुळे मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi), चेन्नई (Chennai) सहित प्रमुख शहरात इंधनाच्या (Fuel Prices) किमती प्रति लिटर साठी 70 ते 80 रुपयांवर गेल्या आहेत. मुंबई मध्ये तर पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजेच 81.53 रुपये इतकी झाली आहे, तर प्रति लिटर डिझेल साठी 71.48 इतकी किंमत आहे.
तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लानिंग अँड एनालिसिस सेल (PPAC) ने सांगितले की, मे मध्ये तब्बल 1.465 कोटी टन इंधनाची विक्री झाली आहे. ही विक्री एप्रिल च्या तुलनेत 47.4 टक्के जास्त होती. वाढत्या मागणीमुळे इंधनचे भाव वाढत आहे. देशातील प्रमुख शहरात पेट्रोल डिझेलचे काय दर आहेत हे जाणून घ्या.
पेट्रोल आणि डिझेल चे मुख्य शहरातील दर
शहर | पेट्रोल चे दर | डिझेल चे दर |
मुंबई | 81.53 | 71.48 |
दिल्ली | 74.57 | 72.81 |
चेन्नई | 78.47 | 71.14 |
कोलकाता | 76.48 | 68.70 |
हैदराबाद | 77.41 | 71.16 |
चंदिगढ | 71.79 | 65.08 |
जयपुर | 81.35 | 73.73 |
पाटणा | 79.03 | 71.69 |
बंगळुरु | 76.98 | 69.22 |
दरम्यान, पेट्रोल-डीजल च्या किमतीचे लेटेस्ट अपडेट आपण मेसेज वरून सुद्धा प्राप्त करू शकता. इंडियन ऑयल च्या वेबसाइट वर सांगितल्यानुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून आपण 9224992249 या नंबरवर पाठवू शकता. यांनंतर तुम्हाला अपडेट मिळवता येतील.