![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/petrol_pti-380x214.jpg)
युक्रेन-रशिया युद्धाचे (Russia-Ukraine War) परिणाम आता जगभरामध्ये दिसायला सुरूवात झाली आहे. या युद्धाचा पहिला प्रमुख परिणाम तेलाच्या किंमतींवर झाला आहे. खाद्यतेलांसोबतच इंधन दर देखील भडकण्यास सुरूवात झाली आहे. भारतामध्ये या युद्धाच्या परिणामासोबतच आता विधानसभा निवडणूकांची धामधूम संपल्याने पुन्हा इंधन दर गगनाला भिडण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी या निवडणूकीचा शेवटचा टप्पा संपताच आपल्या गाड्यांच्या टाक्या फुल्ल केल्या आहेत. त्यामुळे आता भारतात इंधनाचे दर काय आहेत? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
भारतामध्ये आज (9 मार्च) काही शहरांमध्ये किंचित स्वरूपात पेट्रोल,डिझेलचे दर वाढल्याचे चित्र आहे. मेट्रो शहरांमध्येही चेन्नई वगळता इतर शहरामध्ये इंधनदर कायम आहे. त्यामुळे पहा देशातील मेट्रो शहरांसोबत महराष्ट्रातील तुमच्या शहरातील इंधनाचा नेमका दर किती? हे देखील नक्की वाचा: Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम, भारता खाद्यतेल महागले, प्रति किलो 20 रुपयांनी दरवाढ.
पेट्रोल, डिझेलचे दर काय?
मुंबई
पेट्रोल - Rs 109.98 प्रति लीटर
डिझेल - Rs 94.14 प्रति लीटर
दिल्ली
पेट्रोल - Rs 95.41 प्रति लीटर
डिझेल - Rs 86.67 प्रति लीटर
कोलकत्ता -
पेट्रोल - Rs 104.67 प्रति लीटर
डिझेल - Rs 89.79 प्रति लीटर
चैन्नई -
पेट्रोल - Rs 101.40 प्रति लीटर
डिझेल - Rs 91.43 प्रति लीटर
इथे जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या शहरात आजच्या पेट्रोल, डिझेल च्या किंमती!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशातील इंधनदरवाढीवर बोलताना कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याने त्याचा परिणाम भारतातही इंधनदरांवरही होणार आहे, असे म्हटले आहे मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू नये म्हणून सरकार वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले.