Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती सहाव्या दिवशी सुद्धा स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

Petrol Diesel Price Today: देशात आज सहाव्या दिवशी सुद्धा पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले आहेत. यापूर्वी 27 फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलच्या किंमती तुफान वाढल्याचे दिसून आले होते. देशाच्या राजधानीत पेट्रोल 91.17 रुपये आणि डिझेल 81.47 रुपये प्रति लीटर आहे. हे दर All Time High वर आहेत. देशातील सर्व मेट्रो शहरात पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीच वढलेले असतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात 16 दिवस इंधनाचे दर वाढल्याचे दिसून आले होते. या वेळी दिल्लीत पेट्रोल 4.74 रुपये आणि डिझेल 4.52 रुपयांनी महागले होते. परंतु 1 जानेवारी पासून ते आतापर्यंत पेट्रोल 7.36 रुपयांनी महागले आहे. त्याचसोबत डिझेलच्या किंमतीत ही 7.60 रुपयांनी वाढल्या. नव्या वर्षात ते आतापर्यंत 25 आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीसह रुपये आणि डॉलरमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम इंधनांवर होते. कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारवर पेट्रोलची किंमत ठरवली जाते. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर.(पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान Narendra Modi यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज हटविण्यात यावे; ECI चे निर्देश)

-दिल्लीत आज पेच्रोल-डिझेलच्या दर कोणताच बदल झालेला नाही. पेट्रोल 91.17 रुपये आणि डिझेल 81.41 रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे.

- मुंबईत सुद्धा दर स्थिर असून पेट्रोल 97.57 रुपये आणि डिझेल 84.35 रुपये प्रति लीटर आहे.

-चेन्नईत पेट्रोल 93.11 रुपये आणि डिझेल 86.45 रुपये आहे. येथे सुद्धा इंधनाच्या किंमतीत बदल झालेला नाही.

-कोलकाता मध्ये पेट्रोल 94.22 रुपये आणि डिझेल 86.37 रुपये प्रति लीटर आहे.

पेट्रोल-डिझेलरचे दर नेहमी सकाळी 6 वाजता बदलतात. हे दर तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.