प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या दर झळकवले आहेत. त्यानुसार आज तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेट्रोलचे दर 26 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटरने वाढले आहे. दिल्लीत बाजारात पेट्रोल93.94 रुपये तर डिझेल 84.89 रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 100.19 रुपये आणि डिझेलच्या किंमती 92.17 रुपये प्रति लीटरवर पोहचल्या आहेत. शुक्रवारी (28 मे) तेलाचे दर स्थिर होते. पण त्याच्या एक दिवस अगोदर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला होता.

याआधी शुक्रवारी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी तेलाच्या किंमतीत कोणतीच वाढ केली नव्हती. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरवर पोहचण्यापूर्वी थांबले होते. दरम्यान, जयपूर मध्ये आधीच पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरच्या पार गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत गुरुवारी वाढ होण्यापूर्वी 100 रुपयांच्या पार गेल्या होत्या. 27 मे रोजी तेल कंपन्यांनी दरात वाढ केल्यानंतर 28 मे रोजी बाजारात दर स्थिर होते. तर जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील इंधनाचे दर.

>>दिल्ली

-पेट्रोल- 93.94 रुपये प्रति लीटर, डिझेल- 84.89 रुपये प्रति लीटर

>>मुंबई

-पेट्रोल- 100.19 रुपये प्रति लीटर, डिझेल- 92.17 रुपये प्रति लीटरय

>>चेन्नई

-पेट्रोल- 95.51 रुपये प्रति लीटर, डिझेल- 89.65 रुपये प्रति लीटर

>>कोलकाता

-पेट्रोल- 93.97 रुपये प्रति लीटर, डिझेल- 87.74 रुपये प्रति लीटर

दरम्यान, प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या मध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात. याच सोबत आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत त्याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो.

आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.