Petrol Diesel Price Today: आज नागरिकांना दिलासा, 24 दिवसानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट
Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

Petrol Diesel Price Today:  शासकीय तेल कंपन्यांकडून आज 24 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे दिसून आले आहे. आज डिझेल 17 आणि पेट्रोल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 90.99 रुपये तर डिझेलचे दर 81.30 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल 97.40 रुपये आणि डिझेल 88.42 रुपये आहे.तर प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होतात. त्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या दरांमध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश असल्याने त्याचे दर दुप्पट होतात.

याच गोष्टींच्या आधारावर पेट्रोल दर आणि डिझेलचे दर रोज ठरविण्याचे काम तेल कंपन्या करतात. डिलर  हे पेट्रोल पंप चालवणारे लोक असतात. ते मूळ किंमतीसह, कर आणि स्वत:चे मार्जिन जोडून पेट्रोलची विक्री करतात.पेट्रोल रेट आणि डिझेल रेट मध्ये ही रक्कम जोडली जाते. तर जाणून घ्या प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर.(Pan Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा, अन्यथा भरावा लागू शकतो 10,000 रुपयांचा दंड)

>>दिल्ली

डिझेल: 81.30 रुपये, पेट्रोल: 90.99 रुपये

>>कोलकाता

डिझेल: 84.18 रुपये, पेट्रोल: 91.18 रुपये

>>मुंबई

डिझेल: 88.42 रुपये, पेट्रोल: 97.40 रुपये

>>चेन्नई

डिझेल: 86.29 रुपये, पेट्रोल: 92.95 रुपये

पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून सुद्धा तपासून पाहू शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड क्रमांक वेगळा असून तुम्हाला तो आयओसीएलच्या वेबसाइटवर मिळू शकतो.