Petrol, Diesel Prices Today: सलग तिसर्‍या दिवशी भारतामध्ये इंधन दरात वाढ; पहा पेट्रोल, डिझेलचे तुमच्या शहरातील दर
Fuel Rates | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये आज पेट्रोल (Petrol) , डिझेलच्या (Diesel)  किंमतींमध्ये सलग तिसर्‍या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वर-खाली होत असल्याने देशातही इंधन दराचा भडका उडताना पहायला मिळालं आहे. देशात इंधनाचे दर आज 35 पैशांनी वाढलं आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी उच्चांकी स्तर गाठला आहे. मुंबई ( मध्ये पेट्रोल ₹114.47 तर डिझेल ₹105.49 आहे. दिल्ली मध्ये पेट्रोल ₹108.64 तर डिझेल ₹97.37 प्रति लीटर आहे. भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती ऑईल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून रोज जारी केल्या जातात. सकाळी 6 च्या सुमारास त्या किंमती जाहीर केल्या जातात.

भारतातील प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे आजचे दर

1. मुंबई

पेट्रोल - Rs 114.47 प्रति लीटर

डिझेल - Rs 105.49 प्रति लीटर

2. दिल्ली

पेट्रोल - Rs 108.64 प्रति लीटर

डिझेल - Rs 97.37 प्रति लीटर

3. चैन्नई

पेट्रोल - Rs 105.43 प्रति लीटर

डिझेल - Rs 101.59 प्रति लीटर

4. कोलकाता

पेट्रोल - Rs 109.12 प्रति लीटर

डिझेल - Rs 100.59 प्रति लीटर

5.बंगळूरू

पेट्रोल - Rs 112.43 प्रति लीटर

डिझेल - Rs 103.35 प्रति लीटर

भारतामध्ये सर्वात जास्त इंधनाचे दर राजस्थानच्या गंगानगर मध्ये आहे. तेथे पेट्रोल 120.89 तर डिझेल 111.77 प्रति लीटर आहे. प्रत्येक राज्यामध्ये इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. लोकल टॅक्स व्हॅट यांच्या प्रभावामुळे भारतात प्रत्येक ठिकाणी इंधनाचे दर वेगळे आहेत.

भारतामध्ये सार्‍याच महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर सुमारे 18 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशामध्येही इंधनाचे दर 100 री च्या पार आहेत.