Petrol, Diesel Prices Today: भारतामध्ये मुंबई सह प्रमुख शहरात इंधनाचे दर उच्चांकी स्तरावर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!
Fuel Price Hike India | (File Image)

भारतामध्ये इंधन दरवाढ (Fuel Rates) अजूनही कायम आहे. देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये (Petrol, Diesel Prices) 35 पैशांनी वाढ झाली आहे त्यामुळे देशात पुन्हा इंधनाच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. सर्वाधिक इंधनाचा दर देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) शहरामध्ये आहे. मुंबईत आज पेट्रोलसाठी प्रति लीटर 114.14 रूपये आणि डिझेलसाठी 105.12 रूपये प्रतिलीटर मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल 108.29 रूपये तर डिझेल 97.02 रूपये प्रति लीटर आहे.

भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती ऑईल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून रोज जारी केल्या जातात. सकाळी 6 च्या सुमारास त्या किंमती जाहीर केल्या जातात. ऑईल मार्केटिंग कंपनीच्या दरांवर प्रत्येक राज्यातील लोकल टॅक्स, चार्जेस जोडून अंतिम किंमत ठरवली जाते. त्यामुळे प्रत्येक शहरात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत.

भारतातील प्रमुख शहरामधील आजचा इंधन दर 

1. मुंबई

पेट्रोल - Rs 114.14 प्रति लीटर

डिझेल - Rs 105.12 प्रति लीटर

2. दिल्ली

पेट्रोल - Rs 108.29 प्रति लीटर

डिझेल - Rs 97.02 प्रति लीटर

3. चैन्नई

पेट्रोल - Rs 105.13 प्रति लीटर

डिझेल - Rs 101.25 प्रति लीटर

4. कोलकाता

पेट्रोल - Rs 108.78 प्रति लीटर

डिझेल - Rs 100.14 प्रति लीटर

5.बंगळूरू

पेट्रोल - Rs 112.06 प्रति लीटर

डिझेल - Rs 102.98 प्रति लीटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

जागतिक स्तरावरील इंधन दराचा देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर परिणाम होत असतो. आज जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 2.1 टक्क्यांनी घसरला आणि 84.58 डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव 2.4 टक्क्याच्या घसरणीसह 82.66 डॉलर प्रती बॅरल इतका झाला. उत्पादन कमी असल्याने कच्च्या तेलाचा भाव 86 डॉलर पुढे गेला आहे. हा 2014 नंतर तेलाचा हा सर्वाधिक दर असल्याचं सांगितलं जात आहे.