देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण कायम, मुंबईत आज दर १६ पैशांनी पुन्हा घसरले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण (Photo Credits: ANI)

डॉलरसमोर स्थिरावत असलेला रुपया आणि आंतर राष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या तेलाच्या किंमती यामुळे पेट्रोल आणि डीझेलचे भाव सतत्याने कमी होत आहेत. गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल डीझेलच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळणारी घसरण सामान्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. मुंबईत आज १६ पैशानी दर कमी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल ८३ रुपये २४ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७५ रुपये ९२ पैसे इतका आहे.

४ ऑक्टोबरला डिझेल आणि पेट्रोलचे दर सर्वाधिक होते. या दिवशी मुंबईत पेट्रोल नव्वदीच्या पार तर डिझेल ८०च्या पार गेलं होतं. यानंतर राज्यसरकार आणि केंद्र सरकारने काही रुपयांची सूट देत सामान्यांवरील भार हलका केला होता.

 

देशभरात काही राज्यांमध्ये व्हॅटवर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तेथे ५ रुपयांनी पेट्रोल -डिझेलचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे. एकीकडे पेट्रोलचे दर कमी होत असले तरीही गॅस सिलेंडरचे दर नुकतेच वाढले आहेत. मात्र मुंबईकरांना पुढील १५ दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर अजून कमी होणार असल्याने दिलासादायक चित्र आहे.