Petrol and Diesel Prices in India: सलग 11 व्या दिवशी पेट्रोल डिझेल दरवाढ कायम; देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये 17 जून रोजी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?
Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) दर सलग 11 व्या दिवशी वाढले असून गेल्या वर्षभरातील हे सर्वाधिक दर आहेत. 7 जून पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती. आज सलग 11 व्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 5.42 रुपयांनी वधारले असून डिझेलचे दर 5.8 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये  (Delhi) पेट्रोल 77.28 रुपये प्रति लीटरने मिळत असून डिझेल 75.79 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 79.08 रुपये प्रति लीटर असून डिझेल 71.38 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. मुंबईतील पेट्रोल दरात 0.53 रुपयांनी वाढ झाली असल्याने पेट्रोलचे दर 84.15 रुपये इतके आहेत. तर डिझेलचे दर 57 पैशांनी वधारले असून 74.32 रुपये प्रति लीटरने डिझेल विकले जात आहे.

शहर
आजचा पेट्रोल दर

कालचा पेट्रोल दर
नवी दिल्ली

 77.28(0.55)

 76.73

कोलकाता

 79.08(0.53)

 78.55

मुंबई

 84.15(0.53)

 83.62

चेन्नई

 80.86(0.49)

 80.37

गुरगांव

 75.62(0.21)

 75.41

नोएडा

 78.77(0.33)

 78.44

बंगळुरु

 79.79(0.57)

 79.22

भुवनेश्वर

 77.67(0.55)

 77.12

चंदीगढ

 74.39(0.53)

 73.86

हैद्राबाद

 80.22(0.57)

 79.65

जयपूर

 84.22(0.54)

 83.68

लखनऊ

 78.57(0.38)

 78.19

पाटणा

 80.89(0.42)

 80.47

त्रिवेंद्रम

 79.00(0.7)

 78.30

क्रुड ऑईलची किंमत 20 डॉलर प्रती बॅरल झाल्यानंतर राज्यस्तरीय तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमागे प्रती लीटर 8 रुपये तोटा होत होता. मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत पत्र लिहिले आणि या पत्रात त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करुन सामान्यांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे.