
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आज (16 जून) देशामध्ये पुन्हा इंधनवाढ केलेली आहे. काल इंधनदरात कोणतेही वाढ न केल्यानंतर आज पुन्हा देशभर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये आज पेट्रोलचे दर 24 पैशांनी वधारले आहेत तर डिझेलचे दर 14 पैशांनी वधारले आहेत. दरम्यान आजचा मुंबईतला पेट्रोलचा दर प्रतिलीटर 102.82 रूपये आहे तर डिझेलचा दर प्रतिलीटर 94.84 रूपये इतका आहे. दिल्लीतही आज पेट्रोल 25 पैसे तर डिझेल 13 पैशांनी वधारल्याचं चित्र आहे. मुंबई मध्ये 29 मे दिवशीच पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे आणि आता त्यामध्ये आतापर्यतची वाढ नोंदवली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात. पेट्रोल, डिखेलच्या दरांवर एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा दर जवळजवळ दुप्पट होतो. विदेशी चलनांचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड ऑईलची किंमत याचा देखील परिणाम रोजच्या इंधन दरांवर होत असतो.
भारतातील प्रमुख शहरांमधील आजचे इंधन दर काय?
- दिल्ली मध्ये पेट्रोल 96.66 रुपये आणि डीजल 87.41 रुपये प्रति लीटर
- मुंबई मध्ये पेट्रोल 102.85 रुपये आणि डीजल 94.84 रुपये
- कोलकाता मध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डीजल 90.25 रुपये
- चेन्नई मध्ये पेट्रोल की कीमत 97.91 रुपये आणि डीजल 92.04 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल, डिझेलचे दर इथे पहा.
आता तुम्हांला घरबसल्या देखील पेट्रोल, डीझेलचे दर पाहता येणार आहेत. त्यासाठी एसएमएस द्वारा अलर्ट्स मिळतात. मुंबईत इंडियन ऑईलच्या दरांसाठी तुम्हांला RSP 108412 हा (RSP <space>Dealer Code of Petrol Pump) या स्वरूपातील मेसेज 9224992249 वर पाठवायचा आहे. तुम्हांला ऑफिशिएअल वेबसाईट वर देखील मॅपच्या आधारे इंधनाचा दर पाहता येणार आहे.