मागील सलग 7 दिवसांच्या इंधनवाढीनंतर आज भारतामध्ये इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोल (Petrol ) डिझेलचे (Diesel) दर अनुक्रमे 110.04 रूपये आणि 98.42 रूपये प्रति लीटर ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती इंडियन ऑईल (Indian Oil) कडून देण्यात आली आहे. तर मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोल सध्या 115.85 रूपये आणि डिझेल 106.62 रूपये प्रतिलीटर इतके आहे. देशात प्रत्येक राज्यागणिक व्हॅट (VAT) वेगवेगळा असल्याने इंधनाच्या दरावर त्याचा परिणाम होऊन भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे आहेत.
भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती ऑईल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून रोज जारी केल्या जातात. सकाळी 6 च्या सुमारास त्या किंमती जाहीर केल्या जातात.
भारतातील प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे आजचे दर
1. मुंबई
पेट्रोल - Rs 115.85 प्रति लीटर
डिझेल - Rs 106.62 प्रति लीटर
2. दिल्ली
पेट्रोल - Rs 110.04 प्रति लीटर
डिझेल - Rs 98.42 प्रति लीटर
3. चैन्नई
पेट्रोल - Rs 106.66 प्रति लीटर
डिझेल - Rs 102.59 प्रति लीटर
4. कोलकाता
पेट्रोल - Rs 110.49 प्रति लीटर
डिझेल - Rs 101.56 प्रति लीटर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल, डिझेलचे दर इथे पहा.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून रोज इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किंमतीवरून बदलले जातात. तसेच यावर रूपया आणि डॉलरचा एक्सचेंज रेट देखील परिणाम करत असतो. जर इंधन दरात काही बदल असेल तर तो सकाळी 6 वाजता नोंदवला जातो.