Penetration In-between Thighs: पिडीतेच्या जांघांमध्ये केलेला लैंगिक अत्याचार सुद्धा 'बलात्कार'च; केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय
Representational Image (Photo Credits: ANI)

बलात्काराच्या (Rape) एका प्रकरणाबाबत केरळ उच्च ब्यायालयाने (Kerala High Court) एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एक मोठी टिप्पणी करताना म्हटले आहे की, जर आरोपीने पीडितेच्या जांघांच्या दरम्यान कोणते लैंगिक कृत्य (Sexual Assault Between Thighs) केले तर त्यालाही भारतीय दंड संहिता कलम 375 नुसार परिभाषित केल्याप्रमाणे बलात्कार मानले जाईल. न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या नेतृत्वाखालील विभागीय खंडपीठाने 2015 च्या बलात्कार प्रकरणात हा निकाल दिला. लाईव्ह लॉच्या बातमीनुसार, या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोषीने केरळ उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

या व्यक्तीवर त्याच्या शेजारी राहणाऱ्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या व्यक्तीने वारंवार या अल्पवयीन मुलीवर विविध मार्गांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या मुलीच्या सतत पोटात दुखू लागले. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला वैद्यकीय शिबिरात नेले. तिथे तपासणीनंतर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. नंतर चाइल्ड लाइनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली. या प्रकरणाची कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली आणि आरोपीला पॉक्सो कायदा आणि अनैसर्गिक संभोग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

शिक्षेच्या विरोधात, आरोपी व्यक्तीने उच्च न्यायालयात एक नवीन अर्ज दाखल केला आणि विचारणा केली होती की, दोन मांड्यांच्यामध्ये लिंग घालणे हे कृत्य बलात्कार कसे ठरू शकते? (हेही वाचा: US Shocker: लहान मुलांसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न करणाऱ्या Disney World मधील 3 कर्मचाऱ्यांना अटक)

यावर न्यायालयाने म्हटले की, योनी, मूत्रमार्ग, गुदद्वार किंवा संवेदना निर्माण करण्यासाठी शरीराच्या इतर कोणत्याही भागासोबत छेडछाड करणे, सर्व प्रकारचे पेनेट्रेटिव्ह सेक्सुअल असॉल्ट या गोष्टी आयपीसीच्या कलम 375 अंतर्गत बलात्कारात समाविष्ट आहेत. खंडपीठाने पुढे म्हटले की, बलात्काराच्या गुन्ह्याच्या व्याख्येची व्याप्ती वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे कायद्यात सातत्याने सुधारणा केली जात आहे. यात आता स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये प्रवेश करणे समाविष्ट आहे.