भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले 195 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र 24 तासाते एका उमेदवाराने माघार घेतली आ पश्चिम बंगालमधील आसनसोल (Asansol) लोकसभेसाठी भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनी आज रविवारी आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले. एक्स वर एक पोस्ट टाकून त्यांनी निवडणूक लढविता येणार नसल्याचे सांगितले आहे.

पाहा भोजपूरी अभिनेता पवन सिंहची पोस्ट -

आपल्या  पोस्टमध्ये पवन सिंह म्हणाले, “मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला आसनसोलसाठी उमेदवारी दिली. पण मी काही कारणास्तव आसनसोल या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित नाही.” या पोस्टमध्ये पवन सिंह यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग केले आहे. पवन सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.

बंगालमधील लोकांच्या ताकदीमुळेच पवन सिंह यांना माघार घ्यावी लागली, असा टोला बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट टाकून लगावला आहे. या घडामोडीनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते साकेत गोखले यांनीही भाजपावर टीका केली.