सिमाचंल एक्सप्रेसला अपघात, सहा जणांचा मृत्यू
सिमाचंल एक्सप्रेस अपघात (फोटो सौजन्य-ANI)

Patna: बिहार येथील हाजीपूर जवळ सिमाचंल एक्सप्रेसला रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 4 वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे.

सदहोई स्टेशनजवळ सीमाचंल एक्सप्रेस जात होती. त्यावेळी अचानक एक्सप्रेसचे 9 डबे रेल्वे रुळांवर खाली घसरले. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या बचावकार्यसाठी दोन अधिक एक्सप्रेस दाखल झाल्या आहेत. तर रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र ही दुर्घटना कशामुळे झाली याबाबत अधिक तपास केला जात आहे.