Parliament Session 2022: राज्यसभेत विरोधी पक्षाचे 19 खासदार निलंबीत, पाहा यादी
Rajya Sabha

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Session 2022) राज्यसभेत (Rajya Sabha) घोषणाबाजी करणाऱ्या आणि वारंवार सभागृहाच्या वेलमध्ये येणाऱ्या 10 राज्यसभा सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व खासदार विरोधी पक्षातील आहेत. यात काँग्रेससह तृणमूल काँग्रेस खासदारांचाही समावेश आहे. निलंबीत खासदारांमध्ये सुष्मिता देव (Sushmita Dev), डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन, मौसम नूर, शांतनु, नदीमुल, गिरिरंजन यांचाही समावेश आहे. लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिरला यांनी आगोदरच काँग्रेसच्या चार सदस्यांना निलंबीत केले आहे. त्यानंतर आता राज्यसभेतही विरोधी पक्षातील सदस्य निलंबीत केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभेमध्ये ओम बीरला यांनी काँग्रेसचे ज्योतिमणी, माणिकम टागोर, टीएन प्रथापन आणि राम्या हरिदास हे चार खासदार सोमवारी निलंबीत केले आहेत. विरोधी पक्षांनी सोमवारी संसदेमध्ये सातत्याने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात काहीसा गदारोळ पाहायला मिळाला. या गदारोळातच दुपारी 2.30 वाजता लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंत जेव्हा पुन्हा कामकाज सुरु झाले तेव्हा ओम बिरला यांनी सभागृहातील सदस्यांनी शांतता बाळगावी अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही सदस्य आकरमकच राहिल्याने ओम बिरला यांनी थेट निलंबनाची कारवाई केली. (हेही वाचा, Fans Inverted in Parliament: भारतीय संसद भवनात उलटे पंखे का लावण्यात आले आहेत? जाणून घ्या त्यामागचं रोचक कारण)

देशातील वाढती महागाई, वाढता जीएसटी आदी मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मत्रिमंडळानेही विरोधकांचे म्हमणे ऐकावे अशी मागणी सभागृहात करण्यात आली. आपल्या मुद्द्यांकडे लक्ष्य वेधण्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कामकाजात वारंवार आडथळा आला.