Security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

भारताकडून कलम 370 (Article 370) रद्द केल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सैरभैर झाला आहे. याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही मदतीचा हात मागितला होता, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता कलम 370 रद्द करण्यावर राज्यात अडथळा निर्माण करण्यासाठी तसेच भारताच्या निर्याचा निषेध म्हणून पाकिस्तान एक मोठी खेळी खेळत आहे. उद्या, 4 ऑक्टोबर 2019 रोजी पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमध्ये एका मोर्चाचे आयोजन केले आहे. भारतीय लष्कराला त्यांच्या सर्वोच्च स्त्रोतांकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

एएनआय ट्विट -

पाकिस्तान या मोर्चाद्वारे काश्मीरमध्ये काही कुरापती करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा मोर्चा उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णतः सज्ज आहे. पाकिस्तान आर्मी पुरस्कृत हा मोर्चा काश्मीर ते नियंत्रण रेष (LOC) पर्यंत असणार आहे. या मोर्चामध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी उकसवले जात आहे. मात्र भारतीय लष्कर पाकिस्तानचा हा डाव उधळण्याच्या पूर्ण तयारीत आहे. (हेही वाचा: Delhi Red Alert: चार दहशतवादी घुसल्याची माहिती; दिल्ली पोलिसांनी 9 ठिकाणांवर मारले छापे)

दरम्यान, पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना आसरा देतो असा आरोप होत आहे. आता भारतावर दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने  3 ते 4 दहशतवादी दिल्लीत शिरले असल्याची बातमी आहे. या गोष्टीमुळे देशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट वर आहेत.