
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार कडून 24 एप्रिल दिवशी सर्व पक्षीय बैठक बोलावली जाऊ शकते. जम्मू कश्मीरच्या पहलगाम (Pahalgam)भागात झालेल्या दहहशतवदी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे. अशी माहिती अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने PTI ने दिली आहे. दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
मंगळवार, 22 एप्रिलच्या दुपारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पागलगाम येथील मुख्य बाजारपेठेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झालाआहे. ज्यात बहुतेक पर्यटक होते. गृहमंत्री अमित शहा आणि सिंह या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांशी बोलत आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.
काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल सिंग वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना माहिती देण्याची अपेक्षा आहे. नक्की वाचा: India Strikes Back: सिंधू पाणी करार स्थगित, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी; Pahalgam Terror Attack नंतर भारताचे 5 महत्त्वाचे निर्णय .
जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सिंह यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. (हेही वाचा, Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची माहिती देणार्यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर).
पीटीआयच्या वृत्तानुसार, संरक्षणमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि लष्कराचे लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक उपस्थित होते.
बुधवार (23 एप्रिल) संध्याकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना लक्ष्य करून झालेल्या सर्वा मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली.