Padma Shri Award 2020: सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण
Rashtrapati Bhavan | (Photo Credits-ANI)

राष्ट्रपती भवन ( Rashtrapati Bhavan) येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी पद्म पुरस्कार 2020 (Padma Awards 2020) बहाल केले. या वेळी माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस ( George Fernandes), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) , अरुण जेटली (Arun Jaitley) यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विदेश मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 119 पद्म पुरस्कार प्रदान केले.

पद्म पुरस्कार 2020 च्या यादीत 7 पद्म विभूषण, 10 पद्म भूषण आणि 102 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. तसेच, एकूण पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये 16 जणांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला बॅडमिंटन प्लेयर पीव्ही सिंधु यांनाही पद्म विभूषण देऊन गौरविण्यात आले. तर गायक अदनान सामी यांना पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या वतीने त्यांच्या कन्या बांसुरु स्वराज आणि अरुण जेटली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी संगिता जेटली यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन 1954 पासून सुरु करण्यात आलेल्या या पुरस्कारांची घोषणा प्रत्यक वर्षी स्वातंत्र्य दिनी होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या अनेकांना 2014 पासून सन्मानित करत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधील लोकांना उत्कृष्ट कार्याचे योगदान दिल्याबद्दल गौरविण्यात येते.

ट्विट

पद्म पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांमध्ये चिकित्सा, संशोधन, सामाजिक कार्य, विज्ञान, इंजिनियरींग, सामाजिक कार्य, कायदा, व्यापार, उद्योग यांसारख्या क्षेत्रात दिलेल्या विशे ष योगदानाबद्दल पुरस्काराच्या माध्यमातून गौरविण्यात येते.