प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली आहे. यंदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी 139 पद्म विजेत्यांची नावं जाहीर केली आहेत. त्यामध्ये 14 पद्म पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर गायक पंकज उदास (Pankaj Udhas) यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. त्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराचा समावेश असतो.
महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते
- अच्युत पालव (कला)
- अरुंधती भट्टाचार्य (व्यापार आणि उद्योग)
- अशोक सराफ (कला)
- अश्विनी भिडे देशपांडे (कला)
- चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
- जसपिंदर नरुला (समाजसेवा)
- अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
- राजेंद्र मुजुमदार (कला)
- सुभाष शर्मा (कृषणी)
- वासुदेव कामत (कला)
- डॉ. विलास डांगरे (औषधी)
पद्मभूषण पुरस्कार विजेते
शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सोबतच मनोहर जोशी आणि पंकज यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; कोणाला मिळाला पद्मश्री पुरस्कार? जाणून घ्या .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
देशातील सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन !
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व सलाम!
आपल्या कार्यक्षेत्रातील आपले योगदान हे महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल.
महाराष्ट्रातील प्रत्येकाला तुमच्या यशाबद्दल अभिमान वाटतो.
महाराष्ट्रातील पद्म…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 25, 2025
1954 पासून दर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले जात आहेत. नंतर दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये सार्या पद्म विजेत्यांना आमंत्रित करून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पार पाडला जातो