Onion Bombs Blast In Andhra Pradesh (फोटो सौजन्य - X/@ndtv)

Onion Bombs Blast In Andhra Pradesh: दिवाळीच्या दिवशी संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असतानाच आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एलुरु जिल्ह्यातून (Eluru District) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुधाकर नावाचा एक व्यक्ती आपल्या स्कूटरवर कांद्याच्या बॉम्बची गोणी घेऊन जात होता. मात्र, बॉम्बची ती गोणी त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली. गोणीत अचानक स्फोट (Onion Bombs Blast) झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याशिवाय या घटनेत काही जण जखमीही झाले आहेत.

सुधाकर दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या स्कूटरवर कांद्याच्या बॉम्बने भरलेली गोणी घेऊन जात होता. यावेळी सुधाकरच्या मागे स्कूटरवर त्याचा एक मित्रही बसला होता. अरुंद रस्त्यावरून स्कूटर पोहोचताच बॉम्बच्या गोणीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही क्षणातचं तेथे धूराचे लोळ पसरले. (हेही वाचा -Nalanda Fire: बिहार मध्ये अवैध पणे सुरू असलेल्या फटाक्याच्या दुकानाला आग (Watch Video))

या स्फोटात सुधाकरचा मृत्यू झाला असून त्याच्या मागे बसलेल्या मित्रासह एकूण 5 जण जखमी झाले आहेत. ही सर्व घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एलुरु जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. (हेही वाचा - Banquet Hall Fire In Noida: नोएडातील बँक्वेट हॉलला आग; इलेक्ट्रिशियनचा मृत्यू (Watch Video))

आंध्र प्रदेशात 'कांदा बॉम्ब'चा स्फोट, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, या स्फोटोत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून स्फोटाचे कारण शोधण्यात येत आहेत.