स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या 137 व्या जयंती निमित्त आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खास ट्वीटच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान त्यासोबतच मन की बात कार्यक्रमातील एक क्लिप शेअर करत विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्याबद्दलता कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. 'सावरकरांच्या साहसाला माझं नमन. ते कायमच त्याच्या शौर्यासाठी, स्वातंत्र्यलढ्यामध्ये इतरांना प्रेरणा स्थान म्हणून आणि सामाजिक सुधारणांमधील त्यांच्या कार्यासाठी, योगदानासाठी स्मरणात राहतील.' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सेनानी, समाजसुधारक, तत्त्वज्ञ होते मात्र त्यासोबतच शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही मेळ घालून समाजाला नवी वाट दाखवणारे संवेदनशील लेखक आणि गीतकार देखील होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक मध्ये भगूर गावात 28 मे 1883 साली झाला होता. प्रखर हिंदुसंघटक असणार्या सावरकरांनी विज्ञानाचा पुरस्कार करत समाजातील रूढी- परंपरांना छेद दिला होता. ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांनी सावरकरांना ' स्वातंत्र्यवीर' ही उपाधी दिली होती. Veer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
On his Jayanti, I bow to the courageous Veer Savarkar. We remember him for his bravery, motivating several others to join the freedom struggle and emphasis on social reform. pic.twitter.com/o83mXmgp1S
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2020
ब्रिटिशांनी रॅन्ड बंधूंच्या हत्येप्रकरणी चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती पुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. आणि त्याचप्रमाणे आपलं सारं आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केलं. 83 व्या वर्षी त्यांचा जीवनातील रस कमी झाल्यानंतर अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. 26 फेब्रुवारी 1966 दिवशी त्यांचे निधन झाले.