संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defence Research and Development Organisation) अर्थातच डीआरडीओ (DRDO) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ओडिशशातून अटक करण्यात आली आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राशी (India’s Defence Sector) संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) याबाबत अधिक माहिती दिली आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याविरुद्ध भादंसं (IPC) कलम 120A आणि 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शिवाय अधिकृत गुप्तता कायद्यानुसारही त्याच्यावरकारवाई करण्यात आली आहे.
ओडिशा पोलिसांच्या हवाल्याने वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, डीआरडीओचा हा 57 वर्षीय अधिकारी ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात असणाऱ्या चांदीपूर येथे कर्तव्यावर होता. तो डीआरडीओच्या एकात्मिक चाचणी श्रेणी (आयटीआर) येथे कर्तव्य बजावत असे. चांदीपूरमध्ये DRDO च्या PXE (प्रूफ आणि प्रायोगिक स्थापना) आणि ITR अशा दोन चाचणी श्रेणी आहेत. (हेही वाचा, Crime: भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची माहिती पाकिस्तानी गुप्तहेरसोबत शेअर केल्याबद्दल DRDO लॅब इंजिनियर अटकेत)
ट्विट
Senior DRDO official arrested in Odisha for allegedly sharing secret information related to India's defence sector with Pakistani spy: Police
— Press Trust of India (@PTI_News) February 24, 2023
पूर्व भागाचे पोलीस महानिरीक्षक हिमांशू कुमार लाल यांनी माहिती देताना सांगितले की, अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने क्षेपणास्त्र चाचण्यांसंबंधी काही संवेदनशील माहिती परदेशी गुप्तहेरांना यशस्वीरित्या पाठवली असल्याची ठोस माहिती उपलब्ध झाली आहे. बालासोरचे पोलीस अधीक्षक (एसपी) सागरिका नाथ यांनी म्हणाले, अधिक चौकशी केल्यानंतरच त्याने विदेशी गुप्तहेरांसोबत सामायिक केलेलाय तपशील जाहीर केला जाऊ शकतो.