Odisha: विहिरीत मिळाली तब्बल कोब्रा सापाची 15 पिल्लं, गावातील लोक हे दृष्य पाहून झाले हैराण
Baby Cobra Snakes. (Photo Credits: Twitter | ANI)

Odisha:  ओडिशा मधील गंजम जिल्ह्यात एका विहिरीतून तब्बल 15 कोब्राची पिल्ल सापडली आहेत. हे सर्व पाहून गावातील लोक हैराण झाली. या सर्व पिल्लांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून दिले. सर्पमित्रांच्या टीमचे सदस्य स्वदेश कुमार साहू यांनी असे म्हटले की, बहरामपुर येथील एका महिलेने फोन करत याबद्दल माहिती दिली. तिने असे म्हटले की, गावातील विहिरीत तिने सापांना पाहिले. त्यानंतर आम्ही तेथे गेलो आणि आम्ही कोब्राच्या 15 पिल्लांना सुरक्षित बाहेर काढले.

यापूर्वी सुद्धा ओडिशा मधील मयूरभंज जिल्ह्यात एका महिलेने आपल्या घरात आठ फूट लांब कोब्रा पकडला होता. खरंतर हा कोब्रा मयूरभंज मध्ये राहणाऱ्या अखिल नावाच्या व्यक्तीच्या घरात घुसला होता. तो आणि त्याच्या पत्नीसह मुलाने ऐवढ्या मोठ्या सापाला पाहिले असता ते घाबरले. त्यावेळी त्याने तातडीने मुलाला घेऊन घराबाहेर गेला.(रात्री बेडरुमध्ये झोपण्यासाठी गेलेल्या महिलेला बेड खाली दिसले चक्क 18 साप, पुढे काय घडले वाचा सविस्तर)

Tweet:

अखिल मुंडा याने ANI यांना असे म्हटले की, जसे मी मुलाला कोब्राच्या येथे रेंगत जाताना पाहिले तसेच लगेच त्याला तेथून बाजूला घेत. अधिकाऱ्यांना फोन करण्यासाठी खिडकीच्या बाहेर उडी टाकली आणि त्यांना या घटनेबद्दल सांगितले. अखिल याच्या पत्नीने यापूर्वीच कोणत्याही सापाला हात सुद्धा लावला नव्हता त्यांनी मोठ्या धाडसाने त्याला तिने पकडले. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावून घरात साप असल्याचे सांगितले. अखिल याच्या पत्नीने मीडियाला सांगितले की, तिने पहिल्यांदाच घरात कोब्रा पाहिला होता.