13,000 Nude Images of Multiple Women: महिलेला आपल्या बॉयफ्रेंडच्या फोनमध्ये आढळले 13,000 मुलींचे नग्न फोटो; तक्रार दाखल, तपास सुरु  
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

कर्नाटकातील बेंगळुरू (Bengaluru) येथील एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला तिच्या प्रियकराच्या फोनमध्ये अनेक मुलींचे 13 हजार नग्न फोटो (Nude Photos) सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे यातील काही मुली त्याच फर्ममध्ये काम करत होत्या. महिलेने सांगितले की, तिला हे फोटो आढळल्यानंतर तिने तरुणासोबतचे संबंध तोडले. त्यानंतर महिलेने 20 नोव्हेंबर रोजी तिच्या कार्यालयातील वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. यासोबतच भविष्यात तिला आणि इतर महिलांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तरुणावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

ही बाबा समोर आल्यानंतर बीपीओच्या कायदेशीर सल्लागाराने 23 नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात आदित्य संतोषविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, बीपीओमधील 22 वर्षीय महिला कर्मचारी 23 वर्षीय आदित्यसोबत 4 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होती. यावेळी, त्या तरुणाने त्या दोघांनी एकांतात एकमेकांसोबत घालवलेले क्षण फोनवर रेकॉर्ड केले. तरुणीला हे फोटो डिलीट करायचे होते व यासाठी तिने जेव्हा त्याचा तपासला तेव्हा तिला त्यामध्ये 13,000 हून अधिक मुलींचे नग्न फोटोज आढळले, जे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: जौनपूरमध्ये दारु पिण्यास विरोध करणाऱ्या दोन सख्ख्या भावांची चाकूने भोसकून हत्या, पोलिसांकडून 6 जणांना अटक)

याबाबत मुलीने कायदेशीर कक्षाकडे तक्रार केली आणि पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान, याआधी अमेरिकेमध्ये शाळा, प्रार्थनास्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी 150 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती किशोरवयीन मुलींनी नग्न फोटोंची मागणी करायचा व मुलींनी फोटो पाठवण्यास नकार दिल्यानंतर या व्यक्तीने विविध ठिकाणी 150 बनावट बॉम्बच्या धमक्या दिल्या.