Musical Fountain in Noida (Photo Credits: Twitter/ANI)

लोकांचे मनोरंजन करण्यासाठी देशात अनेक नानाविध गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. त्यात आणखी भर म्हणून नोएडातील (Noida) सेक्टर-91 (Sector-91) च्या औषधी पार्कमध्ये म्युजिकल फाउंटेन (Musical Fountain) सुरु करण्यात आले आहे. संगीताच्या तालावर थुई-थुई नाचणा-या या कारंजामध्ये लेजर लायटिंग (Lazer Lighting) करण्यात आली आहे. या म्युजिकल फाउंटन चे उद्घाटन सोमवारी (5 ऑक्टोबर) करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे डोळे दिपून टाकणारा हा कार्यक्रम बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगच्या (Social Distancing) नियमांचे पालन करुन एकावेळी केवळ 75 लोकांनाच हा कार्यक्रम पाहता येईल.

नोएडामध्ये सोमवारी संध्याकाळी 7 वाजता हा म्युजिकल फाऊंटेन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी नोएडा प्राधिकरणाचे सीईओ रितु माहेश्वरी यांनी हा कार्यक्रम येथील लोकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरेल. यात भारतीय शास्त्रीय संगीत, धार्मिक कथा, हिंदी गाणी यांचा समावेश करण्यात आला आहे. Maharashtra: ताडोबा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ अशा Black Leopard दिसल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या 'या' बिबट्यांच्या मागील रहस्य

हा लेजर शो बनविण्यासाठी 4.45 कोटी रुपये खर्च आला आहे असल्याचेही त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम येथील नागरिकांना रोज संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोएडा सेक्टर-15 मध्ये महिन्याभरातअसाच एक लाइट एंड साउंड लेजर शो सुरु कऱण्यात येणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु असल्याचे नोएडाच्या सीईओ म्हणाल्या.