Bihar Politics: बिहारमध्ये सत्ता बदलाचे वारे, नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
Nitish Kumar | (Photo Credit - Facebook)

बिहारमध्ये (Bihar Politics) सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटणामध्ये राजकीय वातावरण गरम झाले असून राजकीय पक्षांमध्ये बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत. काही वेळात बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. नितीश कुमार (Nitish kumar) आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. आरजेडी आणि भाजप आप-आपल्या नेत्यांसोबत बैठक घेत आहे. भाजप खासदार आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे पाटणामध्ये उपस्थित आहेत.  (हेही वाचा - Nitish Kumar To Take Oath As CM: भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार; रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ - रिपोर्ट)

बिहारमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीत नितीश कुमार यांना पाठिंबा द्यायचा का नाही हे ठरवलं जाणार आहे. या बैठकीत समहत झाल्यानंतर भाजपकडून पाठिंब्याच पत्र तयार केलं जाईल. ते पत्र आजच राज भवनकडे पाठवलं जाणार आहे.बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबत चिराग पासवान यांच्याशी चर्चा झाली आहे. लोजपच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी चिराग यांना दिले आहेत.

आज विविध विषयावर जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. हम यापक्षाने अनेक बाबींची समस्या त्यांच्यासमोर मांडली. साधरण ३० मिनिटे हम पक्षासोबत चर्चा झाली. त्याच दरम्यान आरजेडी येत्या काही तासांत नितीश सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहे.