नित्यानंद यांनी वाढत्या COVID19 च्या रुग्णसंख्येमुळे भारतातून कैलाशा येथे येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी
Nityananda (Photo Credits-Twitter)

जगभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या दुर्गम बेटांच्या येथे जाण्याचे स्वप्न पाहत असाल आणि ते कैलाशा असेल तर त्याचा विचारच सोडून द्या. स्वत:लाच देव म्हणवणाऱ्या नित्यानंद (Nithyananda) यांनी 2019 मध्ये कैलाशा या स्वत:च्या देशाची त्यांनी स्थापना केली. मात्र या ठिकाणी जाण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण एका विधानात नित्यानंद यांनी असे स्पष्ट केले आहे की, भारतातून येणाऱ्या त्याच्या भाविकांना कैलाशा येथे येण्यास बंदी घातली गेली आहे. यामध्ये फक्त भारतीयच नव्हे तर ब्राझील, युरोपीयन युनियन आणि मलेशिया येथील प्रवाशांना सुद्धा येथे प्रवेश दिला जाणार नाही आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नित्यानंद यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

या संदर्भातील एक ट्विट सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भाविकांना कैलाशा मध्ये येण्यास परवानगी नसल्याचे त्यात म्हटले आहे.(भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने स्थापन केला नवा देश 'कैलास'; मंत्रिमंडळ, झेंडा, पासपोर्ट असा असेल थाट)

Tweet:

नित्यानंद यांनी लॅटिन अमेरिकेच्या इक्वाडोर येथे एक बेट 2019 मध्ये खरेदी केले असून तेथेच राहत आहेत. त्यांच्यावर जेव्हा लैगिंक शोषणाचे आरोप लावण्यात आल्यानंतर त्यांनी भारतातून पळ काढत इक्वाडोर येथे राहतात. तर नित्यानंद यांचा कैलाशा नावाचा एक स्वतंत्र देश सुद्धा आहे.

अखेरच्या विधानात त्यांनी असे म्हटले आहे की, सर्व कैलाशीयन, एकैलाशियन, वॉलन्टीर्स असोसिएटसह अन्य प्रमुखांनी कैलाशा येथे स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. त्याचसोबत स्थानिक नियमांचे सुद्धा पालन करत असल्याने त्यांनी म्हटले आहे.

एका ट्विटर युजर्सने त्यांनी केलेले ट्विट रिट्वीट करत हसण्याचे इमोजी शेअर केले आहे.

Tweet:

Tweet:

 

दरम्यान, बातम्यानुसार असे समोर आले होते कैलाशाची स्वत:ची वेबसाइट kailaasa.org. आहे. तसेच विकिपिडीयावर सुद्धा नित्यानंद यांच्या नावाचे नित्यानंदपीडिया नावाचे पेज आहे. कैलाशाच्या मते ही धरती सर्वात महान हिंदू राष्ट्र आहे. कैलाशाने दावा केला आहे की, ते जगभरातील हिंदू किंवा कोणत्याही धर्माचे, लिंगाचे किंवा कोणत्याही जातीचे असो त्यांना येथे एक सुरक्षितता दिली जाईल. त्यांना येथे शांत राहून आणि कोणत्याही पद्धतीचा हिंसा किंवा कोणीही येथे दखल न घेता आपल्या संस्कृती आणि कलेचे पालन करता येणार आहे. तर ऑगस्ट 2018 मध्ये नित्यानंद यांनी स्वत:ची 'रिजर्व्ह बँक ऑफ कैलाशा' सुद्धा स्थापन केली आहे. या देशाचे चलन हे 'कैलाशीयन चलन' नावाने ओळखले जाते.