
26/11 Mumbai Attack: पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील (26/11 Mumbai Attack) दहशतवादी तहव्वुर राणा (Tahawwur Rana) चा आवाजाचा नमुना आणि हस्तलेखनाचा नमुना घेण्याची परवानगी दिली आहे. एनआयएने (NIA) याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये एनआयएने तहव्वुर राणाच्या आवाजाचे नमुने आणि हस्तलेखनाचे नमुने घेण्याची परवानगी मागितली होती. दहशतवादी तहव्वुर राणा सध्या 12 दिवसांसाठी एनआयएच्या ताब्यात आहे.
यापूर्वी एनआयए न्यायालयाने तहव्वुर राणाची कोठडी 12 दिवसांसाठी वाढवली होती. तहव्वुर राणाला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातून ताब्यात घेण्यात आले होते. तहव्वुर हुसेन राणाचे नाव 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमध्ये घेतले जाते. तो मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा मानला जातो. (हेही वाचा - 26/11 Terror Attack मधील आरोपी Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये अजून 12 दिवसांची वाढ)
हेडली आणि राणा हे शाळेच्या काळापासूनचे मित्र होते. हेडलीने नंतर कबूल केले की तो लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत होता. मुंबई दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. (हेही वाचा - Tahawwur Rana ची कुटुंबासोबत फोनवर बोलण्याची विनंती Delhi च्या Patiala House Court ने फेटाळली)
तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाची घोषणा केली. आम्ही मुंबई हल्ल्याचा आरोपी असलेल्या एका अतिशय धोकादायक व्यक्तीला भारताच्या स्वाधीन करत आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर तहव्वुर हुसेन राणाला 9 एप्रिल 2025 रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.