India Parliament. File Image. (Photo Credits: ANI)

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (Central Public Works Department) नवीन संसद भवन (New Parliament Building) बांधण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने (Tata Projects Ltd) 861.90 कोटी रुपयांची बोली लावली, तर लार्सन आणि टर्बो लिमिटेडने (Larson and Turbo Ltd) 865 कोटी रुपयांची बोली लावली. आता वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने बुधवारी ही बोली प्रक्रिया जिंकली आहे. आता टाटा कंपनी 861.90 कोटी रुपयांमध्ये नवीन संसद भवन बांधणार आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाचा पुनर्विकास करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, नवीन संसद भवन तयार केले जाईल.

अहवालानुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर नव्या इमारतीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश राज्य निर्माण निगम लिमिटेडसह सात कंपन्यांनी नवीन संसद भवन तयार करण्यासाठी पूर्व पात्रतेच्या बोल्या सादर केल्या होत्या. गेल्या महिन्यात सरकारने मुंबई मधील तीन बांधकाम कंपन्यांची नवे निश्चित केली होती, जी नवीन संसद संकुलासाठी अंतिम बिड सादर करतील. यामध्ये Larsen & Toubro, Tata Projects and Shapoorji Pallonji & Company चा समावेश होता. नव्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम 21 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यासाठी 889 कोटी खर्च होईल असा अंदाज होता. पण टाटा प्रोजेक्टने 862 कोटींमध्ये हा करार जिंकला आहे. (हेही वाचा: कोरोना विषाणू काळात टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांची चांदी; कंपनीने जाहीर केला तब्बल 235 कोटींचा बोनस)

एएनआय ट्वीट -

केंद्र सरकारची प्रमुख बांधकाम संस्था सीपीडब्ल्यूडीने म्हटले होते की, नवीन इमारत 'संसद भवन इस्टेट'च्या भूखंड क्रमांक 118 वर बांधली जाईल. काही अहवालात असे सांगितले गेले आहे की, नवीन इमारतीत खासदारांकरिता 900 जागा असतील तर संयुक्त अधिवेशनात 1350 खासदारांची बसण्याची व्यवस्था असेल. 2022 च्या जुलै महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन नव्या संसदेमध्ये होणार आहे.