IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

कडून आता विमान प्रवासादरम्यान प्रवाशांसोबत असलेल्या हॅन्ड बॅगेज रेग्युलेशन साठी नियमात बदल केले आहेत. आता इंटरनॅशनल तसेच डोमेस्टिक प्रवासादरम्यान प्रवाशांना केवळ एकच केबिन बॅग किंवा हॅन्डबॅग सोबत घेऊन जाता येणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता आता प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान व्हावा यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या गाईडलाईन्स नुसार प्रवाशांना हॅन्डसोबत अजून एक केबिन बॅग घेऊन जाता येणार नाही. अधिकचे लगेज प्रवाशाअंना चेक इन करावं लागणार आहे. IndiGoआणि Air Indiaसारख्या एअरलाईन्सकडून आता लगेज पॉलिसी अपडेट करण्यात आली आहे.

Air India च्या इकॉनॉमी आणि प्रिमियम इकोनॉमी क्लासच्या प्रवाशांना एक हॅन्डबॅग 7 किलोपर्यंत आणि फर्स्ट, बिझनेस क्लास प्रवाशांना 10 किलो पर्यंत सामान घेऊन जाता येणार आहे. यामध्ये बॅगेचा आकार 40 cmx20 cm x55 cm पेक्षा जास्त नसावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

IndiGo Airlines कडून प्रवाशांना एक केबिन बॅग कमाल 115 cm लांबीची घेऊन जाता येईल . त्याचं वजन 7 किलो पेक्षा अधिक नसावं. सोबत प्रवासी 3 किलो वजनापर्यंत पर्स किंवा लॅपटॉप बॅग घेऊन जाऊ शकतात.

बदलण्यात आलेल्या या बॅगेज रेग्युलेशन चं लक्ष्य हे विमानतळावर गोंधळ कमी करण्याच्या दृष्टीने आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे आता security checks ला अधिक वेळ लागत आहे. लगेज वर बंधनं आणून आता बोर्डिगची प्रक्रिया सुकर आणि वेगवान करण्याचा प्रयत्न आहे.

Revised Baggage Dimensions मधून कोणाला सूट मिळणार?

ज्यांनी विमानाची तिकीटं 4 मे 2024 पूर्वी बूक केली आहेत त्यांना या बदलेल्या पॉलिसीमधून तूर्तास सुट दिली जाईल

दरम्यान भारतीय विमान कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत मार्गांवर 1.42 कोटी प्रवाशांची वाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 12% वाढली आहे.