अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या एका युवकाने केलेल्या कृत्यामुळे नवी दिल्ली (New Delhi Shocker) हादरली आहे. धक्कादायक म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रातून (De-Addiction Centre) परतल्यावर या तरुणाने हे कृत्य केले आहे. केशव असे या तरुणाचे नाव आहे. तो केवळ 25 वर्षे वयाचा आहे. त्याने आपले आई-वडील, बहीण आणि आजी या सर्वांचा भोसकून खून केला आहे. त्याचे हे धक्कादायक कृत्य पाहून पोलीस आणि परीसरही हादरुन गेला. परिसरतात तर भयान शांतता पसरली होती.
केशव नामक तरुणाच्या घरात कुटुंबीयांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले. पोलिसांना पाहताक्षणी घटनेचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी संशयावरुन आरोपीला तत्काळ अटक केली. नैऋत्य दिल्लीतील पालम परिसरात ही घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कुटुंबीयांचे गळे चिरण्यासाठी धारदार वस्तूचा वापर केला आणि त्यांच्यावर अनेक वेळा वार केले. घटना इतकी भयावह होती की घरात सर्वत्र रक्ताचे पाट वाहात होते. भिंतीवरही रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. (हेही वाचा, Latur: बायकोवर चिडलेल्या नवऱ्याने मारला लेकीला दगड, मार वर्मी लागल्याने मृत्यू; आरोपीला जन्मठेप)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजी दिवाना देवी (75), वडील दिनेश (50), आई दर्शना आणि बहीण उर्वशी (18) या तिघांचे रक्ताने माखलेले मृतदेह आरोपीच्या घरात स्वतंत्र खोलीत सापडले.
आरोपी, केशवने महिन्याभरापूर्वी गुडगावमधील नोकरी सोडली होती आणि दिवाळीपासून तो बेरोजगार होता, असे पोलिसांनी सांगितले. जेव्हा त्याने खून केल्याचा आरोप आहे तेव्हा त्याने अंमलपी पदार्थांचे सेवन केले होते आणि तो त्याच्या अंमलाखाली होता.
केशवने रात्री 10.30 च्या सुमारास कुटुंबीयांवर हल्ला केला. कुटुंबीयांचा आरडाओरडा ऐकून इमारतीत राहणारे शेजारी आणि नातेवाईक धावत आले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या केशवला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.