बँकेच्या खात्यातील रक्कम चोरी होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व बँकांना 31 जानेवारी पर्यंत ईएमव्ही चीप (EMV Chip) असलेली एटीएम (ATM) कार्ड देण्यास सांगितले होते. तसेच ही चीप असलेल्या कार्डांचे अद्याप बँकांकडून वाटप केले जात आहे. मात्र एसबीआय (SBI) बँकेने आपल्या ग्राहकांना नव्याने देण्यात आलेल्या चीपसह मधील एटीएम कार्ड सुरक्षित नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच ग्राहकांना याबाबत ई-मेलद्वारे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी चीप नसलेले एटीएम कार्ड सर्वत्र वापरले जात होते.मात्र बँक खात्यातील रक्कम चोरीला जाणे, एटीएम हॅक करुन पैसे काढणे अशा फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या होत्या. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना चीप असलेले एटीएम कार्ड देण्यात यावे असा आदेश दिला होता. त्यानुसार 1 जानेवारी रोजीच चीप नसलेली एटीएम कार्ड बंद करण्यात आली होती. तर आता नवीन चीप असलेली कार्ड ही स्कीमद्वारे हॅक केली जात असल्याने ग्राहकांची माहिती चोरली जात असल्याची शक्यता बँकेकडून वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा-होमलोनधारकांसाठी खुशखबर! SBI ची नवी ऑफर; कोणत्याही शुल्काशिवाय करा लोन ट्रान्सफर)
त्यामुळे ग्राहकांनी सावधगिरी बाळगून बँक खात्यातील पैश्यांबाबत कोणतीही फसवणुकीची घटना घडल्यास त्वरित बँकेला कळवावे असे सांगण्यात आले आहे. तसेच नजीकच्या सीबीआय बँक शाखेशी संपर्क करुन याबाबत सांगावे.