नॅशनल हरॉल्ड (National Herald Case) प्रकरणाशी संबंधीत कथीत मनी लॉन्ड्रींग प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे. सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस जोरदार आक्रमक झाली असून देशभरात आंदोलने सुरु आहेत. काँग्रेसची आक्रमकता आणि आंदोलनावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून टीका केली आहे. सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशीविरोधात देशभर सत्याग्रह करायचा असे काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठकीत सोमवारीच (25 जुलै) ठरले होते. दरम्यान, सोनिया गांधी ईडी कार्यालयात मंगळवारी (26 जुलै) दाखल झाल्या. त्यानंतर काँग्रेसने आंदोलने सुरु केली.
काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात हौत असलेल्या ईडी चौकशीला काँग्रेस तीव्र विरोध करेन. रस्त्यापासून ते थेट संसदेपर्यंत काँग्रेस हे आंदोलन राबवेन. नवी दिल्ली येथील 24 अकबर रोड येथील पार्टी मुख्यालयात सोमवारी काँग्रेस महासचविवांची पार्टी प्रदेशाध्यक्षांसोबत आणि खासदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत रणनितीवर चर्चा करण्यात आली.
काँग्रेस महासचीव केसी वेणुगोपाल यांनी म्हटले की, काँग्रेस राजघाट येथे सत्याग्रह करु इच्छित होती. परंतू दिल्ली पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही.या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. वेगणुगोपाल यांनी म्हटले की, केंद्र सरकार काँग्रेसला झुकवू पाहात आहे. परंतू, ते शक्य नाही. काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते सोनिया गांधी यांच्या बाबत एकजुटता प्रकट करतील. त्यासाठी ते आंदोलन करतील. ईडीने नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधीत निधी संशोधन प्रकरणात गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांसोबत दोन तास चर्चा केली.