National Awards to Teachers 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 7 सप्टेंबरला शिक्षा सम्मेलनावेळी संबोधित करणार आहेत. या शिक्षा सम्मेलनात (Shiksha Sammelan) देशभरातून मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारकडून 44 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव आर, सी. मीणा आणि संयुक्त सचिव विपिन कुमार यांनी गुरुवारी शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार आणि शिक्षक पर्वासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
शिक्षण मंत्रालयाने या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असे म्हटले की, यंदा 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरा केला जाणार आहे. शिक्षक पर्वच्या निमित्त नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला शिक्षा सम्मेलनाला संबोधित करतील. तर 5 सप्टेंबरला म्हणजेच शिक्षक दिनाच्या वेळी 44 शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सम्मान केला जाणार आहे.(Azadi Ka Amrit Mahotsav अंतर्गत सर्बानंद सोनोवाल यांच्यासह 'हे' 7 केंद्रीय मंत्री बुधवारी Yoga-Break Mobile Application करणार लॉन्च)
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अस्रल्ली गावाच्या श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री उमेश रघुनाथ खोसे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्याचसोबत झारखंड, बिहार, बंगाल, ओडिशा के अलावा हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू-कश्मीर, लद्दाख, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़, नागालैंड, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, सिक्किम, मिजोरम, त्रिपुरा, असम, झारखंड, केरल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, तमिलनाडु आणि पड्डुचेरी येथील शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे.