मुंबई-दिल्ली तिकीट दर पुढील 3 महिन्यांसाठी कमाल 10,000 रूपये; 25 मे पासून सुरू होणार्‍या विमान प्रवासाच्या Airfare बाबत नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली माहिती
Hardeep Singh Puri (Photo Credits: ANI)

भारतात 25 मे पासून विशेष खबरदारीसह देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती काल (20 मे) नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. त्यानंतर आज (21 मे) नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी घेतलेल्या परिषदेत विमान प्रवासखर्चाची माहिती देण्यात आली आहे. "आम्ही किमान आणि कमाल भाडे आकारण्यावर भर दिला असून दिल्ली (Delhi) मुंबई (Mumbai) प्रवासाकरता किमान 3500 रुपये भाडे आकारण्यात आले आहे. हा प्रवास 90-120 मिनिटांचा असतो. तर कमाल भाडे 10000 रुपये इतके ठेवण्यात आले आहे. हे प्रवासभाडे पुढील 3 महिन्यांसाठी लागू करण्यात आले आहे. म्हणजेच 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे तिकीटदर असतील," असे नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले.

मेट्रो ते नॉन मेट्रो सिटीमध्ये प्रवास करण्यासाठी किंवा उलट नॉन मेट्रो सिटीमधून मेट्रो सिटीमध्ये प्रवास करण्यासाठी आठवड्याला 100 हून कमी उड्डाणे असणार आहेत. त्यामुळे समर शेड्यूल 2020 अंतर्गत मान्यता मिळालेल्या कोणत्याही मार्गाने प्रवास करण्याची मुभा विमान कंपन्यांना देण्यात आली आहे. (भारतामध्ये 25 मे पासून सुरू होणार देशांर्गत प्रवासी विमानसेवा; आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक ते थर्मल चेकिंग पर्यंत अशी असेल नियमावली!)

ANI Tweet:

या प्रवासादरम्यान केबिन क्रु मेंबर्संना सर्व प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरणे आवश्यकआहे. त्याचबरोबर एका प्रवाशाला एकच बॅग चेक इन साठी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. विमान उड्डाणाच्या 2 तास आधी प्रवाशांनी विमानतळावर हजर होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोविड 19 फ्री असलेले आरोग्य सर्टिफिकेट किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे सेफ स्टेटस प्रवासपूर्वी दाखवणे प्रवाशांना बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सेतू अॅपवर रेड स्टेटस असलेल्यांना प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखाच्या पार गेला असून बळींचा आकडा 3 हजारांच्या वर आहे. दरम्यान देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून यात अनेक सेवा-सुविधा विशेष खबरदारीसह सुरु करण्यात आल्या आहेत.