MP Harda Blast Update: मध्य प्रदेशात फटाक्याच्या फॅक्टरीतील भीषण स्फोटात 11 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, मालकासह तीन आरोपींना अटक
Imgae Credit - ANI Twitter

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा (Harda) येथे फटाख्याच्या कारखान्यात मोठा स्फोट (Firecracker Factory Blast) होऊन मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झालेत. सोमवारी हरदा येथील फटाखा कारखान्यात स्फोट झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या दोन मालकांसह (Factory Owner) तिघांना अटक केली आहे. स्फोटानंतर आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.  (हेही वाचा - Gujarat News: गुजरात जामनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची सुखरूप सुटका, पाहा व्हिडिओ)

पाहा पोस्ट -

सोमवारी हरदा येथील अवैध फटाका कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांना आग लागली. बैरागड येथील मगरधा रोडवरील अवैध फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. हे अपघातस्थळ राजधानी भोपाळपासून साधारणपणे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली होती.

सध्या जखमींवर उपचार हे सुरु असून गंभीर जखमींची संख्या जास्त असल्याने आता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमी झालेल्या कामगारांपैकी सतराजणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना उपचारासाठी इंदूर, भोपाळ आणि नर्मदापुरम येथे हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देत दोषींना सोडणार नाही, असे म्हटले आहे.